Story Junction - MARATHI PODCAST | मराठी पॉडकास्ट

Story Junction - MARATHI PODCAST | मराठी पॉडकास्ट by Team Story Junction

Team Story Junction

आंबट, गोड, तिखट, खारट या चवींशिवाय जशी जेवणाला मजा नाही तशीच जीवनालाही नाही. या विविध चवींच्या अनेक गोष्टी आपण वाचतो, ऐकतो आणि जगतो. अशाच काही लज्जतदार गोष्टींचा खजिना घेऊन आम्ही आलो आहोत 'स्टोरी जंक्शन मराठी पॉडकास्ट' वर. या गोष्टी तुम्हाला कधी हसवतील, कधी रडवतील आणि कधी विचार करायलाही भाग पाडतील. या स्टोरीज तुमच्या माझ्या सर्वांच्या आहेत ज्यांना वय, वर्ग, वेळेची बंधनं नाहीत. तुम्ही केव्हाही, कुठेही सहकुटुंब या गोष्टींचा आनंद घेऊ शकता. ते ही फ्री!! आमच्या सर्व स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या. For feedback or queries mail us on podcast@d4mad.in

Categories: Society & Culture

Listen to the last episode:

दिवस इतके बदललेत की आता कुठल्या गोष्टीबद्दल आपल्यात भावनाच शिल्लक राहिल्या नाहीत, सणांचा आनंद नाही, युद्धाचं दुःख नाही, भरभराटीचं सुख नाही, कितीही मिळालं तरी तृप्ती नाही. आयुष्य यांत्रिक झाली आणि आपण आपल्या पुढच्या पिढीच्याही नकळत तेच हातात देणार आहोत. आपल्यातली आपुलकी ही जुन्या पातळासारखी दिवसेंदिवस विरळ होत चाललीये. विरळ याकरिता कारण अजूनही काही लोक आहेत ज्यांच्यातल्या भावना माणूस असो वा प्राणी, नाती असो वा निसर्ग प्रत्येकासाठी आजही ज्वलंत आहेत. म्हणून ही आपुलकी विरळ का होईना पण जिवंत तर आहे.

आजची ही स्टोरीही तीन पिढ्यांची आहे. एका पिढीत माणूसपण जिवंत आहे तर दुसरीत लोप पावलंय, आता हे पुढच्या पिढीला काय देणार हे जाणून घेण्यासाठी तर तुम्हाला ही स्टोरी ऐकायला हवी. गोष्टीचं नाव आहे, गावाच्या वाड्यातलं अंड्याचं झाड!  ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने व कंपोज केलीये आकाश जाधव ने. विरळ होत चालेल्या भावनेवर आजही नितांत प्रेम करणाऱ्यांना समर्पित. गावाच्या वाड्यातलं अंड्याचं झाड!

Credits -

Writer - Dipak Bhutekar

Story Editor & Social Media - Sharda Bhawar

SFX, Sound & Packaging - Akash Jadhav

Anchor Voice Artist - Prasad Deshmukh


Voice over artists -

Shaunak Mule, Purva Bhoyte, Harshada Mali, Atharva Tembhekar, Akash Jadhav, Prasad Deshmukh


अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.

For feedback or any queries please mail us at podcast@d4mad.in

instagram - @sjm_podcast   



Previous episodes

  • 21 - गावाच्या वाड्यातलं अंड्याचं झाड | Gavachya Wadyatal Andyach Zaad 
    Thu, 02 Jun 2022
  • 20 - मूर्खांचा बाजार डॉट कॉम | Murkhancha Bazaar Dot Com 
    Wed, 23 Feb 2022
  • 19 - Ep. 1. Pudhe Kay? (The Last Chapter) | पुढे काय? (द लास्ट चॅप्टर) 
    Mon, 31 May 2021
  • 18 - Ep. 2. Godavari (The Last Chapter) | गोदावरी (द लास्ट चॅप्टर) 
    Mon, 31 May 2021
  • 17 - Ep. 3. Punarjanma (The Last Chapter) | पुनर्जन्म (द लास्ट चॅप्टर) 
    Mon, 31 May 2021
Show more episodes

More Indian society & culture podcasts

More international society & culture podcasts

Choose podcast genre