राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor

Rajhansi Mohor is the official Marathi podcast of Pune based leading publication house Rajhans Prakashan, with literary legacy of over seven decades. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी जपणाऱ्या आणि सात दशकांचा साहित्यिक वारसा लाभलेल्या राजहंस प्रकाशनाचा नवीन उपक्रम…राजहंसी मोहोर पॅाडकास्ट. राजहंसी पुस्तकांची ॲाडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॅाडकास्टचं स्वरूप आहे. १ मे २०२४ पासून दर बुधवारी या पॅाडकास्टचा नवीन भाग प्रसारित होईल. दर बुधवारी, नवे पुस्तक, नवा लेखक! Produced by : Rajhans Prakashan Production and Design : SoundsGreat NM Audio Solutions LLP.
00:00
00:00

Episode's summary

लोकेश शेवडे लिखित शहाणा असशील तर लिहू नकोस हे पुस्तक नुकतंच राजहंसने प्रकाशित केलंय. या पुस्तकातील एका लेखातील निवडक भागाचं वाचन करताहेत अपर्णा जोग. पुस्तक खरेदीची लिंक - https://www.rajhansprakashan.com/product-details/shahana-asashil-tar-lihu-nakos-shahanae-asashal-tara Book - Shahana Asshil Tar Lihu Nakos... Author - Lokesh Shevde Narration - Aparna Joag Cover Design - Veerendra Tikhe Executive Producer - Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Episodes

101-

शहाणा असशील तर लिहू नकोस...| Lokesh Shevde | Rajhans Prakashan

लोकेश शेवडे लिखित शहाणा असशील तर लिहू नकोस हे पुस्तक नुकतंच राजहंसने प्रकाशित केलंय. या पुस्तकातील एका लेखातील निवडक भागाचं वाचन करताहेत अपर्णा जोग. पुस्तक खरेदीची लिंक - https://www.rajhansprakashan.com/product-details/shahana-asashil-tar-lihu-nakos-shahanae-asashal-tara Book - Shahana Asshil Tar Lihu Nakos... Author - Lokesh Shevde Narration - Aparna Joag Cover Design - Veerendra Tikhe Executive Producer - Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

15 Apr 2026
100-

सुमन कल्याणपूर: सात्विक सुरांचा नंदादीप | Suman Kalyanpur | New Marathi Book

स्त्रीत्व कसं असेल, तिच्या अलवार मनाला काय भावत असेल, तिचं हळुवार व्यक्त होणं कसं असेल, तर सुमनताईंसारखं..! प्रेमळ, समजूतदार, हळवं, शांत, समर्पित... शांतपणे तेवणारा नंदादीपच जणू. कोवळ्या नाजूक फुलांचा मंद सुगंध, पावसाची हलकीशी सर, झाडाची कोवळी पालवी, पानांवरील निर्मळ दवबिंदू किती उपमा द्याव्यात या आवाजाच्या व्यक्तिमत्त्वाला? त्यानं आपलं असं एक स्थान निर्माण केलं. पौर्णिमेच्या शीतल चांदण्याला जर स्वतःचा आवाज मिळाला तर किती मधुर असेल तो? तरल, सुरेल, वत्सल, शुद्ध उच्चारांचं लेणं लाभलेला, उत्तम पल्ला नि फिरत असणारा, तरी अत्यंत भावपूर्ण... सुमन कल्याणपूर यांच्या मराठी व हिंदी गाण्यातल्या सांगीतिक वैशिष्ट्यांचा स्मरणीय आढावा आणि त्यांच्या निकोप आवाजातल्या निवडक २५ गाण्यांचं रसग्रहण, प्रसिद्ध गायिका अपर्णा संत यांच्या आवाजात... Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/suman-kalyanpur-samana-kalyanaepara Book: Suman Kalyanpur Author: Aparna Sant Podcast Host: Shirish Sahasrabuddhe Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Produced By:…

04 Mar 2026
99-

Done That Been There | Meghana Pethe | Marathi Book Narration

Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/done-that-been-there-da-thata-bthaara हे भुयार आहे की विवर हे समजत नाही. आणि दिवा दाखवायला कुणी नाही. आठवणींच्या गच्च रानात हरवल्यावर हाक द्यायला कुणी नाही. मडक्यांची पुन्हा माती होताना कुणीच सोबत नाही. आणि या वाहत्या नदीच्या पाण्याचा ठाव घेता येत नाही. हे नीट उमगल्यावर माणूस स्वतःशी बोलू लागतो का ? आणि हे असं स्वतःशी बोलणंच असतं का लिहिणं वगैरे ? लिहिणाऱ्या समोर ठाकणारे असे अनेक प्रश्न.. ज्यांची उत्तरं लिहिणाऱ्याला लिहिता लिहिताच उमगत जातात. दुसरे आपल्याला समजतात, तितके मूर्ख आपण खचितच नसतो. पण आपण स्वतःला समजतो, तितके शहाणेही आपण क्वचितच असतो! लिहिताना आणि लिहिल्यावर काय काय झालं, यातली तथ्यं मी मांडताना हे शक्य आहे, की 'या तथ्यांच्या जबड्यातून निसटून, सत्य कदाचित् दूर कुठेतरी एकटंच बागडत असेल!'...डंदॅट् बींदेअर् या आपल्या नवीन पुस्तकातील काही निवडक भाग सादर करताहेत लेखिका मेघना पेठे Book - Done That Been There Author and Publisher - Meghana Pethe Distributor - Rajhans Prakashan Recording - AK Studio Executive Producer: Niranjan Medhekar Produced…

25 Feb 2026
98-

धुळाक्षरे ते शल्यकौशल्य | Dr Dnyaneshwar Dusane | Marathi Book Review

Book link: https://www.rajhansprakashan.com/product-details/dhulakshare-te-shalyakaushalya-thhalikashhara-ta-shalyakashalya त्याच्याजवळ ना पैसा होता, ना कुणाचे पाठबळ. हातावरचे पोट असलेले आईवडील अन् गरिबीच्या उन्हात उभे राहिलेले घर. पण तो फक्त नावापुरता 'ज्ञानेश्वर' नव्हता. आपल्या बुद्धिमत्तेला त्याने चिकाटीची धार चढवली. विलक्षण जिद्द अन् अभ्यासाच्या सातत्यातून तो प्रख्यात शल्यविशारद झाला. हा अवघड वळणाचा प्रवास सांगणारी एका समर्पित सर्जनची संघर्षकहाणी... Book: Dhulakshare Te Shalyakaushalya Author: Dr. Dyaneshwar Dusane Podcast Host: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #marathipodcast #rajhansimohor #rajhansprakashan #rajubaviskar Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

04 Feb 2026
97-

हरित हिंदुत्व | Dileep Kulkarni | Rajhans Prakashan

हिंदुत्वा'ची दोन मूलभूत वैशिष्ट्यं म्हणजे आध्यात्मिक जीवनदृष्टी, आणि त्यातून घडणारी संयमित उपभोगाची जीवनशैली. तसं जगणं, म्हणजेच खऱ्या अर्थानं 'धर्मपालन'; कारण, त्यातूनच पर्यावरणाची 'धारणा' सुनिश्चित होऊ शकते. पश्चिमी विचार-आचारांच्या प्रभावामुळे आपणच त्याला सोडचिट्ठी दिलेली आहे! त्यामुळे, साऱ्या जगाप्रमाणेच आपल्यालाही पर्यावरणाच्या विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा काळात, सध्याचं भरकटलेलं हिंदुत्व नाकारत, निसर्गरक्षणासाठी उपयोगी ठरणाऱ्या मूळ हिंदुत्वाची युगानुकूल मांडणी करणारं, आणि त्याच्या आचरणाचा आग्रह धरणारं हे पुस्तक : स्वतः तसं जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अभ्यासू आणि तळमळीच्या कार्यकर्त्यानं लिहिलेलं...दिलीप कुलकर्णी लिखित हरित हिंदुत्व या पुस्तकातील निवडक भाग आपण ऐकणार आहोत ओंकार थोरात यांच्या आवाजात. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

21 Jan 2026